


स्वागत आहे
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची
बाल विकास मंदिर, सासवड



म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवड
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गसुंदर पुरंदर तालुक्यातील नावाजलेली उपक्रमशील शाळा म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना ११ जून १९८६ साली झाली. सन २०१०-११ हे रौप्यमहोत्सवी वर्ष, या वर्षांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले. ११ जून १९८६ ते आजपर्यंत शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय प्रगतीचा आढावा थोडक्यात घेत आहे . बदलत्या काळानुरूप शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना केली. सुरुवातीला शाळेमध्ये ४७ विद्यार्थी होते.आज ६४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बद्दल
शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्रविस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७४ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आमच्याबद्दल
शाळेचा इतिहास
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात शोभेल अशा या सुंदर शाळेची स्थापना ११ जून १९८६ रोजी झाली. सुरुवातीला म.ए.सो. वाघीरे हायस्कूल प्राथमिक विभाग असे या शाळेला संबोधले जायचे .कार्यक्रम आणि उपक्रम
‘प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. फुलण्यासाठी त्याला एक मोकळं आभाळ हवं असतं.’ या ओळीप्रमाणे शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये..
बातम्या
Posts not found
लेटेस्ट उपक्रम
जमीन जुमला कायद्यात बसवा - ॲड. नेवसे यांचे म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन
श्री.अजय गणेशोत्सव मंडळ सासवड यांचेकडून शाळेचा सन्मान २०२५
बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी निमित्त ' पावनखिंड दौड ' दि.१२-७-२०२५
पावनखिंड दौड शाळेत व्याख्यान