म. ए. सो. च्या बालविकास मंदिर शाळेत पर्यावरण पूरक जीवनशैली अंतर्गत विविध उपक्रम.
१) ऋतुमानानुसार झाडांमध्ये होणारे बदल - या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना माहे जुलै ते माहे फेब्रुवारी पर्यंत शाळेच्या परिसरामध्ये असणाऱ्या तसेच आपल्या घराभोवती असणाऱ्या झाडांमध्ये काय काय बदल होतात याचे निरीक्षण करण्यास सांगून ते निरीक्षण तक्त्यामध्ये नोंदविण्यास सांगण्यात आले आहे.
२) पर्यावरण पूरक गणेश उत्सव - शाळेतील गणेशाची मूर्ती ही शाडूच्या मातीची घेण्यात आली. त्याचबरोबर गणपतीचे सजावट ही पर्यावरण पूरक वस्तूंपासूनच करण्यात आली व जास्तीत जास्त टाकाऊ वस्तु पासून सजावट करण्यात आली.३)नागपंचमी- नागपंचमी या सणाविषयी विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर अशी माहिती सांगण्यात आली व नागपंचमीला बायका ज्वारीच्या लाह्या का वाहतात या यामागचे शास्त्रीय कारण विद्यार्थ्यांना समजावून सांगितले यामुळे विद्यार्थ्यांना ज्वारीच्या लाह्या याचे महत्त्व समजले व विद्यार्थी आपल्या घरी आपल्या पालकांना ज्वारीच्या लाह्या आपल्या शरीराला कशा उपयुक्त आहेत याविषयी सांगू लागले.
४) पर्यावरण पूरक रक्षाबंधन -शाळेमध्ये यावर्षी पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करण्यात आले पर्यावरण पूरक रक्षाबंधन म्हणजेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये असणाऱ्या झाडांना राख्या बांधल्या व या झाडांची आम्ही काळजी घेऊ अशी शपथ घेतली.
शाळेच्या परिसरातील झाडांना राख्या बांधताना विद्यार्थीनी
५) गणेश विसर्जन- आपल्या शाळेतील गणपती बाप्पाचे विसर्जन हे कोणत्याही नदीच्या किंवा विहिरीच्या पाण्यात केले नाही तर एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले त्यामुळे नदीमध्ये मातीचे किंवा फुलांचे प्रदूषण झाले नाही व विद्यार्थ्यांना आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन त्याच प्रकारे करण्यास सांगितले.
६) पंचामृत तयार करणे-आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पंचामृत तयार करणे हे प्रात्यक्षिक घेण्यात आले व त्याचबरोबर पाचही पदार्थांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले .
७) निर्मल्या पासून दूध तयार करणे - निर्मल्या पासून धूप कसे तयार करावे याचा व्हिडिओ विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आला व पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी या निर्मल यापासून दूध तयार केले यामुळे निर्मल्य पाण्यामध्ये न टाकता त्या निर्मळल्याचा टाकाऊ पासून टिकाऊ धूप तयार करण्यात आले. हे प्रात्यक्षिक घटस्थापना झाल्यानंतर घेण्यात आले. नवरात्र मध्ये साठवलेले सर्व निर्माल्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी धूप तयार करण्यासाठी केला.
८) घटस्थापना-घटस्थापना करताना वापरावयाचे धान्य माती नऊ दिवसांच्या नऊ माळा नैवेद्य उपवास बोलला विजयादशमी या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना अतिशय बारकाईने व खोलवर विद्यार्थ्यांना सांगण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना घटस्थापनेमध्ये धान्य का टाकले जाते त्याचबरोबर नऊ माळा का घातल्या जातात यामागचे शास्त्रीय दृष्ट्या कारण विद्यार्थ्यांना समजले.
९) दिवाळी - विद्यार्थ्यांना दिवाळी या सणांमध्ये फटाकडे वाजवू नये यासाठी फटाक्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘फटाके वाजवू नका प्रदूषण वाचवा ‘यावर आधारित पथनाट्य शहरातील महत्वाच्या चौकामध्ये सादर केले व आपण प्रदूषण विरहित दिवाळी कशी साजरी करू शकतो याविषयीचे संदेश देणारे पथनाट्य सादर केले.
१०) विविध स्पर्धांच्या आयोजन -दिवाळी सणानिमित्त ” पर्यावरणाचे रक्षण करा”.” पर्यावरण वाचवा” या विषयावर आधारित विद्यार्थ्यांच्या चित्रकला ,रांगोळी ,वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे रांगोळी चित्र काढले व आपल्या चित्रातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे संदेश दिले. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास कसा होत चालला आहे आणि त्यावर कशी उपाययोजना करावी याबद्दल विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भाषण केले.
११)पालकांसाठी व्याख्यान - पालकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय काय केले पाहिजे . आपल्याला पर्यावरणाचे रक्षण कशाप्रकारे करता येईल याबद्दलची माहिती समजून सांगण्यासाठी पालकांना श्रावणी शुक्रवार हळदी कुंकवा निमित्त डॉ.नीरज कामथे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .
विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
१२) पर्यावरण पूरक रांगोळी - शाळेत दिवाळीच्या निमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने रांगोळीच्या कलरचा वापर न करता तांदळाच्या कन्यांची रांगोळी काढली यामुळे नकळत शाळेच्या परिसरातील मुंग्या,कीटक व पक्षी यांची देखील दिवाळी साजरी झाली.
१३)वृक्षारोपण - शाळेतील शिक्षकांनी व काही विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट म्हणून काही झाडे व रोपे दिले त्यामुळे शाळेच्या परिसरात झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले व यामुळे पर्यावरण संरक्षणास मदत झाली.
१४)आहार विषयक जनजागृती यावर आधारित बालसभा - इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आहार विषयक जनजागृती यावर आधारित बालसभेचे आयोजन केले व या बालसभेतून सर्व विद्यार्थ्यांना आहार विषयक माहिती दिली.





म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेत योग दिन साजरा.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत आंतररष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
योग दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यानी विविध आसने, सूर्यनमस्कार घातले. यात शाळेतील एकूण ५८५ विद्यार्थी - विद्यार्थ्यानी, शिक्षक सहभागी झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊ बडधे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. श्री. कांदळकर सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाची माहिती सांगितली. यावेळी क्रीडा शिक्षक श्री. माणिक शेंडकर, श्री. नरेंद्र महाजन व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

म. ए.सो. बाल विकास मंदिर शाळेचा आषाढी वारी निमित्त सासवड येथील म. ए.सो. च्या बाल विकास मंदिर शाळेत दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेमध्ये पालखी सोहळा घेण्यात आला. यामध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथपालखी तयार केली होती. शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री बडधे सर यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. दोन विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी च्या पोशाखामध्ये आले होते. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

गणेश उत्सव २०२४-२५
गणेश उत्सव २०२४-२५ मध्ये इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांनी श्री गणेश प्रतिष्ठापना केली. श्री गणेश प्रतिष्ठापना उत्सव कालावधीत शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.बडधे सरांनी विद्यार्थ्यांकडून गणेश आरती आणि अथर्वशीर्ष पाठांतर करून घेतले. तसेच अजय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सासवड येथे इ.४थी च्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठन केले. श्री गणेश उत्सव सजावटीमध्ये " गणपती बाप्पाचे घर " तयार केले होते.


नवरात्र उत्सवानिमित्त शाळेमध्ये कन्या पूजन २०२४-२५
नवरात्र उत्सवानिमित्त शाळेमध्ये कन्या पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये पालकांनी कन्या पूजन केले. कन्या पूजनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापक श्री.भाऊ बडधे सर यांनी केले व कन्या पूजनाची माहिती सौ.कदम बाईंनी सांगितली.

शिक्षक दिन २०२४-२५
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत "शिक्षक दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या पालक शिक्षक संघ आणि पालकांच्या वतीने करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊ बडधे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. पालकांनी शाळेच्या सर्व स्टाफचा सन्मान केला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊ बडधे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत विविधतेतून एकतेचा संदेश देत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
यावर्षी स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. सुमंत वाघोलीकर तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध ढोलकी वादक प्रल्हाद कदम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे तसेच, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, शंतनु सुरवसे, शिक्षक प्रतिनिधी सुरेखा जगताप, पालक प्रतिनिधी सौ. मनिषा टिळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. संगीत शिक्षक श्री. बापू जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अनुराज चाचर, सार्थ शिंदे, अनन्या भिसे उपस्थित होते.
मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी प्रास्ताविकातून शाळेचा अहवाल सादर करत शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील यशप्राप्तीवर प्रकाश टाकला. दिपक कांदळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी, वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना, पालक , शिक्षक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या बक्षिसांची नावे नरेंद्र महाजन यांनी घोषित केली.
त्यानंतर, विविधतेतून एकता या संकल्पनेखाली विविध राज्यांची झलक दाखविणारी नृत्य, नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुजरात, पंजाब, राजस्थान, गोवा, महाराष्ट्र, जम्मू - काश्मिर, तामिळनाडू, केरळ या राज्यांची सांस्कृतिक परंपरांचा वेशभूषा, भाषा आणि नृत्यातून परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी या सादरीकरणातून विविधतेतून एकतेचा संदेश दिला. सूत्रसंचालन स्वाती बोरावके , अश्विनी कदम यांनी केले. आभार सुरेखा जगताप यांनी मानले.


पर्यावरण पूरक रांगोळी २०२४-२५
यावर्षी दिवाळी सण साजरा करताना यामध्ये जी रांगोळी काढली होती, ती पर्यावरण पूरक अशी काढली होती. यामध्ये रंगीत तांदळाचा वापर करून तसेच फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून रांगोळी तयार केली होती. या उपक्रमात रांगोळी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी काढली होती. शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री.बडधे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


बाल विकास मंदिर शाळेत व्याख्यान
पालकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय काय केले पाहिजे . आपल्याला पर्यावरणाचे रक्षण कशाप्रकारे करता येईल याबद्दलची माहिती समजून सांगण्यासाठी पालकांना श्रावणी शुक्रवार हळदी कुंकवा निमित्त डॉ.नीरज कामथे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .

विविध शालेय स्पर्धा २०२४-२५
१)रांगोळी स्पर्धा- इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची नवरात्री निमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती.
२)राखी बनविणे स्पर्धा - रक्षाबंधन निमित्त टाकाऊ वस्तु पासून विद्यार्थ्यांनी राखी तयार केल्या व राख्या बनवून झाडांना बांधल्या.
३)पणती रंगविणे स्पर्धा- इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचे दिवाळीनिमित्त पणती रंगवणे स्पर्धा घेण्यात आली.
४) मेहंदी काढणे स्पर्धा -व नाग बनविणे स्पर्धा- नागपंचमीनिमित्त मुलींच्या मेहंदी काढणे स्पर्धा व मुलांचे नाग बनवणे स्पर्धा घेण्यात आली.
५)गणेश मूर्ती बनविणेस्पर्धा - इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या.
६)आकाश कंदील बनविणे स्पर्धा- दिवाळीनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे आकाश कंदील तयार केले.

*बाल विकास मंदिर शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश*
अहिल्यानगर येथे १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न झालेल्या म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धेत बाल विकास मंदिर शाळेने सर्वसाधारण व्दितीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी दरवर्षी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत असते. या वर्षी ह्या स्पर्धा संस्थेच्या अहिल्यानगर येथील शाळेत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत संस्थेच्या महाराष्ट्रातील १८ शाळांमधील १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हे क्रीडा स्पर्धेचे तेरावे वर्ष होते. या स्पर्धेत लंगडी, गोल खो खो, डॉजबॉल, सांघिक सूर्यनमस्कार असे विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेतील ७२ विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. यात, सूर्यनमस्कार मुले - प्रथम क्रमांक, डॉजबॉल मुली - प्रथम क्रमांक, गोल खो खो मुले - व्दितीय क्रमांक, सूर्यनमस्कार मुली - व्दितीय क्रमांक, लंगडी मुले - व्दितीय क्रमांक, गोल खो खो मुली - तृतीय क्रमांक, लंगडी मुली - तृतीय क्रमांक, डॉजबॉल मुले - तृतीय क्रमांक मिळवून विजयी झाले. तसेच, इरा जगताप गोल खो खो अष्टपैलू खेळाडू, आर्या निकुडे लंगडी उत्कृष्ठ खेळाडू, स्वरांगी फडतरे डॉजबॉल उत्कृष्ठ आक्रमक, श्री पवार लंगडी उत्कृष्ठ खेळाडू या विद्यार्थ्यांना वैयक्तिक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे , मीना खोमणे, अश्विनी कदम, शीतल चौधरी, स्वाती बोरावके, राणी गिरमे, सुरेखा जगताप, माधुरी जगताप यांनी मार्गदर्शन केले.
शाळेचे शाला समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, महामात्र प्रा. सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, मेघा जांभळे, मंजुषा चोरामले, शारदा यादव यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.



संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी
सोमवार दिनांक १७/२/२०२५ रोजी आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री.बडधे सर व शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.चोरामले मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या विषयीची माहिती सांगितली.

