- उपक्रमशील शाळा
- भव्य क्रीडांगण
- प्रशिक्षित शिक्षक वृंद
- सेमी इंग्रजी वर्ग
- बाह्य परीक्षांना वाव
- शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रेसर
- निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण
- विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग
- शिस्तबद्ध छात्रगण
- १००% उपस्थिती पट नोंदणी
- अप्रगत विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास
- पालकांसाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
- सर्व सण-उत्सव साजरे केले जातात.
- माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा
- कलेसाठी स्वतंत्र शिक्षक
- माता-पालक,पालक-शिक्षक संघ
- शाला-व्यवस्थापन, परिवहन, पोषण आहार समिती
- तंत्रस्नेही शिक्षक
- उत्तम ऑनलाइन अध्यापन
- शिक्षणप्रबोधिनी तर्फे शिक्षकांना अद्ययावत अध्यापनशास्त्राचे सतत मार्गदर्शन
- प्रभावी इंग्रजी अध्यापन
- शिक्षक-विद्यार्थी गुणवत्ता विकासात कायम अग्रेसर
- आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
- NEP-२०२०ची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन डिजिटल ज्ञानरंजन वर्गाची सन २०२२-२३ पासून सुरुवात ( मातृभाषेतील शालेय शिक्षणाबरोबर संस्कृत, Spoken English, संगणक, संगीत, चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा या विषयांचा समावेश )
- शाळा एक डिजिटल कॅम्पस (संगणकीकृत निकाल,विद्यार्थी माहिती व हजेरी)
- ग्रंथालय
- मुबलक स्वच्छ पाणीपुरवठा
- स्वच्छ प्रसाधनगृहे
- बोलक्या भिंती व विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी आकर्षक खेळणी
- शालेय पोषण आहार
- विद्यार्थी मार्गदर्शनासाठी व्यक्तिमत्व विकास केंद्र
सासवड व सासवड परिसरातील पालकांची आपल्या पाल्यास याच शाळेत प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरु झाली. परंतु इ. १ली ते ४थी एकाच तुकडीस परवानगी असल्याने मर्यादित प्रवेश दयावे लागत होते. पालकांचा रोष पत्करावा लागत होता. परंतू, थोडयाच कालावधीत म्हणजे जून १९९५ ला इ. १ली ते ४थी च्या दुसऱ्या तुकडीस शासन मान्यता मिळाली. सन २०१४ रोजी आपल्या शाळेतील दोन्ही वर्ग सेमी इंग्रजी सुरु केले आहेत.
