म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत नवागतांचे स्वागत
सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची बाल विकास मंदिर शाळा पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या आवाजाने गजबजून गेले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थी व पालकांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले. शासन नियमानुसार पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली. तसेच गोड खाऊ दिला. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, मंजुषा चोरामले, शारदा यादव, पहिलीच्या वर्गशिक्षिका साधना राऊत , शितल चौधरी, अश्विनी कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवडचे उल्लेखनीय यश

म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवड या विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ८८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशामध्ये श्रेयस सचिन वाघोले याने विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने परीक्षेत एकूण २४४ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून पुरंदर तालुका शहरी विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
श्रेयसच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्याचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि सहकारी विद्यार्थी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी व शिक्षकवृंदाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश निश्चित मिळते,” हे या विद्यार्थ्यांच्या कामगिरीने सिद्ध केले आहे.
https://bapumulik1212.blogspot.com/2026/08/blog-post_11.html
म.ए.सो.ज्ञानवर्धिनी परीक्षा २०२६ आणि मंथन राज्यस्तरीय परीक्षा शाळेचे यश


