म.ए.सो.प्रशालेत "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" उपक्रम
१६४ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेने यावर्षी "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" या संकल्पनेवर आधारित वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूल व म.ए.सो.चे बाल विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना पुणे येथील फ्रेंड्स ऑफ रेपटाईल्स अँड एन्व्हारमेंटल सेव्हिंग ट्रस्ट (FOREST) या संस्थेच्या वतीने म.ए.सो.चे माजी विद्यार्थी सागर कुटे, चेतन निगडे आणि सागर पाटील यांच्या हस्ते सुमारे १००० सीडबॉल्सचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना सीडबॉल्सचा योग्य वापर करून पावसाळ्यात विविध मोकळ्या जागांमध्ये त्यांचे रुजवणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून अधिकाधिक वृक्षांची निर्मिती होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी पावसाच्या सरींसोबत हरित स्वप्न रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याची प्रेरणा घेतली.
यावेळी , म.ए.सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , मंजुषा चोरामले , माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, भाऊसाहेब येळे, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे, निकिता होले, रेश्मा जगताप आदी उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/Da20hGxjEh_/?igsh=bGt6ZXhnYzNjdWNy
म. ए. सो. प्रशालेत 'पावनखिंड दौड'चे उत्साहात आयोजन
सासवड महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'पावनखिंड दौड' या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य, धैर्य आणि स्वराज्याच्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शौर्याचा आदर्श घ्यावा, असे सांगितले.कार्यक्रमात नरेंद्र महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रमुख व्याख्याते कुंडलिक पाटोळे यांनी पावनखिंडीच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व, वीर बाजीप्रभूंचे अद्वितीय शौर्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य समजून घेऊन त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.यावेळी, बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , पर्यवेक्षिका अर्चना लडकत तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने पावनखिंड दौडीत सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खैरनार यांनी प्रभावीपणे केले. आभार भाऊसाहेब बडधे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील शौर्यगाथेची प्रेरणा मिळाली आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

म.ए.सो. बाल विकास मंदिर, सासवड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सासवड, दि. 20 जून 2026 : म. ए. सो. बाल विकास मंदिर, सासवड येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवार, दिनांक 20 जून 2026 रोजी शाळेच्या आचार्य अत्रे सभागृहात विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. भाऊसाहेब बडधे सर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापकांनी योगाचे महत्त्व विशद केले. योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माणिक शेंडकर यांनी केले.
योग दिनाचे महत्त्व व इतिहास याविषयीची माहिती श्री. दीपक कांदळकर यांनी विद्यार्थ्यांना दिली.
तसेच श्री.नरेंद्र महाजन, सौ.स्वाती बोरावके,सौ.अमृता जगताप आणि क्रीडा शिक्षक श्री.नितीन ठोंबरे यांनी विविध योगासने व प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
या कार्यक्रमात इयत्ता तिसरी व चौथीच्या एकूण 335 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पद्मासन यांसारख्या योगासनांसह सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर केली.
शेवटी उपस्थितांचे आभार सौ. सुरेखा ओव्हाळ यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. योग दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व आरोग्यवर्धक ठरला.
म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत बालदिंडीचे आयोजन

सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव मा.श्री.सुधीर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब बडधे, वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. शाळेच्या परिसरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीत शाळेतील सर्व विद्यार्थी , मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते. मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब बडधे, श्री.नरेंद्र महाजन, श्री.दिपक कांदळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सौ.मंजुषा चोरामले, सौ.साधना राऊत व श्रीम.अमृता जगताप यांनी आरतीचे गायन केली. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा साकारली होती. तसेच सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात टाळ, भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीची रोपे असल्याने दिंडीला खऱ्या वारीचे स्वरूप प्राप्त झाले.या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ' झाडे लावा, झाडे जगवा' , ' पाणी आडवा, पाणी जिरवा' असा संदेश दिला."ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा, पालखी तयार करणे, अभंग गायन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सौ.स्वाती बोरावके यांनी आषाढी एकादशी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.अमृता जगताप यांनी केले.
बातमीची लिंक - https://bapumulik1212.blogspot.com/2026/07/blog-post_22.html