शाळेचा इतिहास

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात शोभेल अशा या सुंदर शाळेची स्थापना ११ जून १९८६ रोजी झाली. सुरुवातीला म.ए.सो.  वाघीरे हायस्कूल प्राथमिक विभाग असे या शाळेला संबोधले जायचे .

  •  सन १९८७ साली इ १ ली व २री च्या वर्गास शासन मान्यता मिळाली . पुढे इ. ३ री सन १९८८ व सन १९८९  रोजी  इ. ४ थी असे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून सासवडमधील अनेक पालकांची आपल्या पाल्यास याच शाळेत प्रवेश मिळावा म्हणून धडपड सुरू झाली.
  • सन १९८५ ते १९९३ पर्यंत शाळेचे मुख्याध्यापक म्हणून वाघीरे हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. की. भा बळी, मा. मे. गो. गोसावी व नंतर मा. ज. बा.  काकडे  यांनी काम पाहिले. तसेच १९८६ ते १९९४ पर्यंत मा .श्री . मारणे यांनी विभाग प्रमुख म्हणून शाळेचे काम पाहिले.
  • नोव्हेंबर १९९३ मध्ये मासौप्रतिभा मधुकर मायभटे यांची मुख्याध्यापिका म्हणून नेमणूक झाली आणि या विभागाचे स्वतंत्रपणे काम चालू झाले.  पुढे इ१ली ते ४थी चे प्रत्येकी २ वर्ग असे एकूण ८  वर्ग झाले .
  • ऑगस्ट  १९९९ पासून मा सौ. स्वाती संजय चिंबळकर यांच्याकडे मुख्याध्यापिका पदाचा कारभार आला याच काळात शाळेला १००% टक्के अनुदान प्राप्त झाले
  • जून २००३ ते २००८ मध्ये श्री. अनिल खिलारे यांनी शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले जून २००८ ते २००९ या काळात शाळेतील शिक्षिका सौ. अलका जगताप यांनी १ वर्ष प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले
  • जून २००९ पासून सौ. चिंबळकर स्वाती या मुख्याध्यापिका म्हणून शाळेत रुजू झाल्या .काळाची गरज ओळखून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इ१ली पासून सेमी इंग्रजीचे शिक्षण मिळाले पाहिजे याकरिता जून २०१४ पासून इ१लीचा सेमी इंग्रजीचा वर्ग सुरू करण्यात आला
  • जून २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ मा. सौ. उज्ज्वला गायकवाड या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून रुजू होत्या
  • १ नोव्हेंबर २०१४ पासून मा. सौ. स्वाती चिंबळकर या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या
  • १ जून २०२२ पासून मा सौ. प्रतिभा गायकवाड या मुख्याध्यापक या पदावर रुजू आहेत
  • १ सप्टेंबर २०२३ पासून मा. श्री. भाऊ बडधे हे मुख्याध्यापक या पदावर रुजू आहेत

सन १९८६ साली ४७ विद्यार्थी होते. आता सन २०२४ रोजी ६७० विद्यार्थी संख्या आहे.

विविध टप्यावरील मुद्दयांसंदर्भात सांख्यिकी माहिती:

 

विद्यार्थी संख्या

‌१९८६ स्थापना वर्ष ४७   विद्यार्थी
१९९६ ३५१ विद्यार्थी
२०११ ५१४ विद्यार्थी
२०१६ ६९१ विद्यार्थी
२०२४ ६७० विद्यार्थी

शिक्षक संख्या

१९८६  स्थापना वर्ष १ शिक्षक
१९९६ ८ शिक्षक
२०११ १० शिक्षक
२०१६ १२ शिक्षक
२०२४ १३ शिक्षक

प्रशासकीय कर्मचारी संख्या

१९८६  स्थापना वर्ष १ कर्मचारी
१९९६ १ कर्मचारी
२०११ १ कर्मचारी
२०१६ १ कर्मचारी
२०२४ १ कर्मचारी

सेवक संख्या

१९८६  स्थापना वर्ष १ सेवक
१९९६ १ सेवक
२०११ १ सेवक
२०१६ २ सेवक
२०२४ ३  सेवक

 ग्रंथसंपदा संख्या

१९८६  स्थापना वर्ष  ते १९९६ ६४१ ग्रंथ
२५ वे  वर्ष १२१९
३०  वे वर्ष १३०४
Scroll to Top