विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा शाळा नेहमीच प्रयत्न करते.
‘प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. फुलण्यासाठी त्याला एक मोकळं आभाळ हवं असतं.’ या ओळीप्रमाणे शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, नीटनेटकेपणा इ. सुप्त गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो.
शिवसृष्टी उपक्रम
शिवसृष्टी उपक्रम सन २०००-०१( शिवरायांचे जीवन चरित्र ) इ.४ थी च्या पाठ्यपुस्तकावर आधारित.
उपक्रमाचा उद्देश- शिवरायांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना समजणे.
- शिवरायांची स्फूर्ती घेऊन विद्यार्थी भावी काळात देशाचे चांगले नागरिक व्हावेत. तसेच उत्तम संस्कार व्हावेत.
- ऐतिहासिक संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे.
- किल्ले, तक्ते, प्रसंग, प्रतिकृती असे अनेक देखावे सजावटीसह उत्कृष्टपणे तयार केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, स्वनिर्मितीचा आनंद सामाजिक बांधिलकी इ. गुण वाढीस लागले.
- शिवजन्मापूर्वीचा कालखंड.
- शिवरायांचा जन्म.
- शिवरायांचे सवंगडी व शिक्षण.
- शिवरायांवर जिजाबाईंनी केलेले संस्कार.
- स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा.
- लाल महालातील प्रसंग.
- आग्रा प्रसंग.
- गनिमी कावा
- शिवरायांचा राज्याभिषेक.
- अष्टप्रधान मंडळ इ.
सासवड दर्शन उपक्रम
विद्यार्थ्यांना आपले गाव व परिसर याविषयी सखोल माहिती व्हावी. म्हणून ‘सासवड दर्शन’ हा उपक्रम राबविण्यात आला.
‘सासवड आमचं गाव महान, आहे नवरत्नांची खाण’
‘संतांची ही पावन भूमी’
‘अत्र्यांची ही जन्मभूमी’
सासवड पार्श्वभूमी – इ.१ली :
१) पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, आधुनिक सासवड तक्ता. २)दिवेघाट प्रतिकृती ३) कऱ्हामाईचा उगम तक्ता. ४) सासवड- प्रतिकृती. ५) पुरंदर प्रतिकृती, - ६) किल्ले पुरंदर तक्ता.सासवडमधील थोर व्यक्ती इ.२री
१) बाजी पासलकर समाधी, तक्ता, प्रसंग. २) पेशवे बाळाजी विश्वनाथ भट- समाधी प्रसंग. ३) आचार्य प्रल्हाद केशव अत्रे – तक्ता, प्रसंग. ४) होनाजी बाळा- प्रसंग, पोवाडा. ५) उमाजी नाईक - प्रसंग. ६) बाळोजी कुंजीर, सखाराम भगवंत बोकीस, पुरंदरे घराणे, जगताप घराणे-तक्ता.सासवडमधील प्रसिद्ध मंदिरे इ. ३ री :
१) वटेश्वर मंदिर - प्रसंग, तक्ता. २) संगमेश्वर मंदिर - प्रतिकृती, प्रसंग – ३) सिद्धेश्वर मंदिर - प्रसंग, तक्ता. ४) सोपानदेव मंदिर - प्रसंग तक्ता. ५) भैरवनाथ मंदिर – तक्ता, चित्र, प्रसंग. ६) इतर मंदिरे व तक्ते.( समजाई मंदिर, भवानी माता मंदिर, खंडोबा मंदिर, गणपती मंदिर)पुरातन काळापासून आधुनिकतेकडे वाटचाल – इ.४थी :
- सरकारी कार्यालये – तक्ता, प्रसंग.
- नगरपालिका.
- एस.टी. स्टँड.
- सरकारी दवाखाना
- कचेरी.
- पोलिस स्टेशन.
- शाळा.
- म.ए.सो. चे हायस्कूल, सासवड.
- पुरंदर हायस्कूल, सासवड..
- आबासाहेब पुरंदरे वाडा.
- म्हाडा घरे.
उपक्रम थोरांची ओळख
आपल्या ‘भारत’ देशाला इंग्रजाच्या गुलामगिरीतून सोडवून भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी प्राणार्पण केले. अशा थोर व्यक्तिची ओळख आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून त्यांना प्रेरण मिळावी या उद्देशाने शाळेमध्ये थोरांची ओळख हा उपक्रम आयोजित केला होता..
- महात्मा गांधी, महात्मा फुले, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, राजगुरु, सुखदेव, भगतसिंग, झाशीची राणी, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. सर्व व्यक्तींचे जीवन चरित्रे, त्यांची महत्त्वाची कामगिरी प्रत्यक्ष प्रसंगातून विद्यार्थ्यांनी दाखविली. तक्ते, प्रसंग, प्रतिकृती, वर्गसजावट करुन वातावरण निर्मिती केली. एकूण दोन दिवस उपक्रम सादर करण्यात आला होता.शालेय वातावरण आनंददायी, उत्साहपूर्ण झाले होते. या उपक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष श्री. र. य. वंजारवाडकर, महामात्र डॉ. श्री. गुप्तासर, प्रमुख पाहुणे श्री. सचिन खेडकर तसेच पालक, गावातील अन्य नागरिक, सासवडमधील अनेक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक यांनी उपक्रमास भेट देऊन विशेष कौतुक सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे केले.
- आजपर्यंत अभ्यासविषयक व सहशालेय विषयावर शाळेने राबवलेले अनेक उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध परीक्षा व वार्षिक स्नेहसंमेलन यांची माहिती खालीलप्रमाणेः
- शिवसृष्टी
- थोरांची ओळख..
- सासवड दर्शन.
- आजी-आजोबा मेळावा.
- आनंद बाजार.
- एक मुष्टी धान्य दान’.
- ममता सदन कुंभारवळण – सिंधुताईंच्या आश्रमास भेट व मदत व साई चिल्ड्रेन्स होम.
- वनवासी कल्याण आश्रमास १४ पोती धान्य व शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी रोख २०००रु. ही भेट म्हणून दिले..
- रक्षाबंधन पोलिस बांधवांना राखी बांधणे.
- सैनिक बांधवांना राखी पाठविणे.
- मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबर रक्षाबंधन कार्यक्रम करणे.
- अनाथ मुलींसमवेत दिवाळी साजरी करणे.
- क्रांतिदिन सप्ताह.
- विज्ञान प्रदर्शन.
- हस्तकला व चित्रकला प्रदर्शन.
स्पर्धा
- विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढविणे तसे बौद्धिक विकास करणे यादृष्टीने शाळेत अनेक स्पर्धांचे नियोजन करण्यात येते.
- निबंधलेखन, हस्ताक्षर, स्मरणखेळ, पाठांतर, गायन, रांगोळी, कथाकथन इ.
- ५० मी. धावणे, दोरीच्या उड्या, चेंडूफेक, बेडूक उडी, उलटे चालणे, लिंबू चमचा इ.
- लोकमतद्वारा आयोजित ‘संस्काराचे मोती’
- कथाकथन स्पर्धा- कै. श्री. व. पु. काळे यांच्या स्मरणार्थ : म.ए.सो. बालशिक्षण मंदिर, डेक्कन.
- म.ए.सो. आंतरशालेय क्रीडास्पर्धा.
- नवनीत चित्रकला स्पर्धा.
- सकाळ चित्रकला स्पर्धा.
- lसूर्यनमस्कार स्पर्धा – योग विद्या संस्कार केंद्र, सासवड यांच्या वतीने घेण्यात येणारी स्पर्धा.
- तालुकास्तरीय समुह गायन व नृत्य स्पर्धा – स्व. गऊबाई जगताप यांच्या स्मरणार्थ झालेल्या पुरंदर तालुका स्तरीय ‘आचार्य अत्रे नृत्य व गायन गौरव स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले आहे.
- कलावर्धिनी अंतर्गत रंगवेध चित्रकला स्पर्धेत सहभाग
विविध परीक्षा
- शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता विकास व्हावा यादृष्टीने शाळा सतत प्रयत्नशील असते. शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला आहे.
- गणित परिचय परीक्षा - दरवर्षी या परीक्षेत विद्यार्थी विशेष योग्यता मिळवितात.
- मंथन पब्लिकेशन आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा.
- महाराष्ट्र ज्ञानपीठ परीक्षा (मुंबई).
- मातृभाषा परीक्षा इ.
- म. ए. सो. ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षा सहभाग
सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम
- पालखी सोहळा, रक्षाबंधन, दहीहंडी, दिवाळी, रंगपंचमी गणेशोत्सव इ. सण, उत्सव शाळेत आनंदाने साजरे केले जातात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.
- श्रावणी शुक्रवार हळदी कुंकू समारंभ.
- तिळगूळ समारंभ आयोजित करुन पालकांसाठी व्याख्यान ठेवले जाते.
वार्षिक स्नेहसंमेलन
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी विविध विषयांवर आधारित स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. निनाद खळदकर, डॉ. स्मिता शिवरकर, तृप्ती खळदे, भाग्यश्री न्हालवे तसेच अनेक मान्यवरांनी यानिमित्त भेट देवून शाळेविषयी आपले प्रेम व्यक्त केले.
आंतर शालेय क्रीडा करंडक स्पर्धा
- सन २००५ -२००६ या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शाळेने यावर्षी अद्वितीय असे यश संपादन केले. विविध खेळातील एकूण ७५ गुण मिळून शाळेस सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.
- सन २००६ -२००७ म ए सो प्राथमिक शाळा क्रीडा स्पर्धा यावर्षी बारामती येथे झालेल्या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी आपल्या शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले जवळजवळ १०० पैकी ९० गुण मिळवून हा चषक पटकावला.
- सन २००७ -२००८ यावर्षी शिरवळ, बारामती ,सासवड या तीन शाळांचा मिळून क्रीडा महोत्सव सासवड येथे झाला .या आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेने यावर्षी अद्वितीय असे यश संपादन केले. विविध खेळातील एकूण ५८ गुण मिळवून शाळेस सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. अशाप्रकारे सलग तीन वर्ष आंतरशालेय क्रीडा करंडक जिंकणारी एकमेव शाळा म्हणजे आपली म.ए.सो बाल विकास मंदिर शाळा होय.
- यानंतर सन २०१४ -१५ या वर्षी म. ए. सो. बाल शिक्षण मंदीर ( इंग्रजी माध्यम ) मयूर कॉलनी , पुणे येथे झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत लंगडी ( मूले ) विजेता संघ , गोल खो खो (मुले) उपविजेता संघ, डॉजबॉल (मुली) उपविजेता संघ, सर्वसाधारण विजेते पद (मुले.)
- २०१५ -२०१६ यावर्षी म.ए.सो ज्ञानमंदिर आणि म.ए.सो पब्लिक स्कूल कळंबोली या शाळेत दि-१६,१७,१८ जानेवारी २०१५ या दिवशी भरलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून मानाचा म. ए. सो. क्रीडा करंडक पटकावला. लंगडी (मुले) विजेता संघ, लंगडी (मुली) उपविजेता संघ, गोल खो खो (मुले-मुली) उपविजेता संघ तसेच ७ खेळांडूना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- सन २०१६ -१७ मध्ये बारामती येथे झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत लंगडी (मुलगे) तृतीय क्रमांक, डॉजबॉल (मुली) तृतीय क्रमांक पटकावला तसेच २ विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- सन २०१७ -१८ मध्ये म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा , पुणे येथे झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत लंगडी (मुलगे) विजेता संघ. लंगडी (मुली) तृतीय क्रमांक, गोल खो खो (मुले-मुली) तृतीय क्रमांक, डॉजबॉल (मुली) तृतीय पटकावला. तसेच १ विद्यार्थ्याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- सन २०१८ -१९ मध्ये म. ए. सो. इंग्लिश मिडियम स्कूल शिरवळ जि. सातारा येथे झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत लंगडी (मुलगे) उपविजेता संघ, गोल खो खो (मुले) उपविजेता संघ, गोल खो खो (मुली) तृतीय क्रमांक तसेच ३ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- सन २०१९ -२० मध्ये म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर डे. जि. पुणे येथे झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत लंगडी (मुले) उपविजेता संघ, डॉजबॉल (मुले – मुली) तृतीय संघ तसेच खेळांडूना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- सन २०२२-२३ मध्ये सासवड येथे झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद आपल्या म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेकडे होते. या स्पर्धेत लंगडी (मुले) उपविजेता संघ, डॉजबॉल (मुली) उपविजेता संघ , सूर्यनमस्कार (मुले, मुली)उपविजेता संघ , लंगडी (मुली) तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, २ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
- सन २०२४-२५ मध्ये अहिल्यानगर येथे झालेल्या आंतरशालेय म.ए.सो.क्रीडा करंडक स्पर्धेत म.ए.सो.बाल विकास मंदिर शाळेने सर्वसाधारण व्दितीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. यात सूर्यनमस्कार मुले - प्रथम क्रमांक, डॉजबॉल मुली - प्रथम क्रमांक, गोल खो खो मुले - व्दितीय क्रमांक, सूर्यनमस्कार मुली - व्दितीय क्रमांक, लंगडी मुले - व्दितीय क्रमांक, गोल खो खो मुली - तृतीय क्रमांक, लंगडी मुली - तृतीय क्रमांक, डॉजबॉल मुले - तृतीय क्रमांक मिळवून विजयी झाले. तसेच, इरा जगताप गोल खो खो अष्टपैलू खेळाडू, आर्या निकुडे लंगडी उत्कृष्ठ खेळाडू, स्वरांगी फडतरे डॉजबॉल उत्कृष्ठ आक्रमक, श्री पवार लंगडी उत्कृष्ठ खेळाडू या विद्यार्थ्यांना वैयक्तिक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
