
श्री.भाऊसाहेब बडधे
म.ए.सो.बाल विकास मंदिर, सासवड ही आपली शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. उत्तम गुणवत्ता व दर्जा असणारी तसेच सर्वाधिक पटसंख्या असणारी आपली शाळा आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत वर्षभर विवध उपक्रम राबविले जातात. क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, स्पर्धा परीक्षा, स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल असे अनेक उपक्रम शाळेत राबविले जातात. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून ज्ञानरंजन वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कृत, संगीत, स्पोकन इंग्रजी, संगणक, ॲबॅकस इ. जादा विषयांचे अध्यापन केले जाते.
दरवर्षी होणाऱ्या म.ए.सो.क्रीडावर्धिनी आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शाळा लंगडी, गोल खो-खो, डॉजबॉल, तसेच सूर्यनमस्कार स्पर्धेत यश मिळवत आहे. सुशिक्षित पालकवर्ग, शाळेचे लाडके माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून शाळेचा सर्वांगीन विकास होण्यास मदत होत आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास व शैक्षणिक विकास हे शाळेचे ध्येय आहे.
