बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी निमित्त ' पावनखिंड दौड '
दि.१७/७/२०२५
सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बालविकास मंदिर तसेच इंग्लिश मीडियम स्कूल आणि म. ए. सो. क्रीडावर्धिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त सासवड शहरातून पावनखिंड दौडचे आयोजन केले होते.
सासवड शहरातून अमर चौक मुख्य बाजारपेठ शिवतीर्थ चौक या मार्गाने पावनखिंड जवळ आयोजित केली होती. सासवड येथील शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा शेवट शाळेत व्याख्यानाने झाला.
सासवड येथील शिवव्याख्याते कुंडलिक पाटोळे यांचे व्याख्यान यावेळी आयोजित केले होते. पाटोळे यांनी आपल्या व्याख्यानात वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या ओघवत्या शैलीतून त्यांनी बाजीप्रभू यांचा पराक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उभा केला.
यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, कल्पना नागनूर - खांडेकर , पर्यवेक्षिका सरोज बाला , क्रीडाशिक्षक दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नरेंद्र महाजन यांनी करून दिला. सूत्रसंचालन माणिक शेंडकर यांनी केले. आभार भाऊसाहेब येळे यांनी मानले.



जमीन जुमला कायद्यात बसवा - ॲड. नेवसे यांचे म.ए.सो.बाल विकास मंदिर,सासवड शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन
सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल विकास मंदिर आणि जन अदालात संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण या पवित्र महिन्याचे औचित्य साधून महिला पालकांसाठी हळदी कुंकू तसेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कायदा जनजागृती शिबीर अंतर्गत सासवडच्या बाल विकास मंदिर शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित केले होते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला असता पालकांना कायद्याची माहिती असावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सरस्वती पूजन करून या व्याख्यानाला सुरुवात झाली.
या व्याख्यानासाठी जन अदालात संस्था, पुणे चे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे यांनी बचत आणि गुंतवणूक, पीक पाणी शेरा, आपल्या शेतीचा किंवा मालमत्तेचा सातबारा नियमित काढत राहणे, मालमत्तेसंदर्भात असणारे विविध उतारे, वतनदारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपली मालमत्ता सुरक्षित राहावी म्हणून ती कायद्यात बसवा, तसेच सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी आपली न्यायव्यवस्था सुदृढ आहे. असे ॲड. नेवसे म्हणाले.
महिलांचे अधिकार आणि हक्क याविषयावर पुणे बार असोसिएशन च्या सचिव ॲड. भाग्यश्री गुजर–मुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी कौटुंबिक कायदा, महिला सुरक्षितता, बालकांचे लैंगिक छळ, पालकांचा संरक्षण कायदा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य याविषयी मार्गदर्शन केले. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आपण न्यायालयात धाव घेऊ शकतो. त्याविषयी महिलांच्या बाजूने कायदे आहेत असे ॲड. गुजर–मुळे म्हणाल्या.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब बडधे यांनी केले. यावेळी म.ए.सो.वाघीरे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.शंतनू सुरवसे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.मेघा जांभळे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा श्रीम. विद्या टकले, शाळेच्या माजी विद्यार्थिनी ॲड. गौरी जगताप आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन माधुरी जगताप, अश्विनी कदम, राजगौरी जगताप, माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, शीतल चौधरी, मीना खोमणे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी कदम यांनी केले. आभार मंजुषा चोरामले यांनी मानले.

गणेश उत्सव निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी अजय सार्वजनिक गणेश मंडळामध्ये अथर्वशीर्ष पठन केले.

म.ए.सो.बाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा.
म.ए.सो.बाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन उत्साहात – शाळेच्या पालक संघाकडून कार्यक्रमाचे आयोजन. पालक संघाकडून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिक्षक हा भारताची भावी पिढी घडवत असतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाल विकास मंदिर शाळेत पालक संघाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, तसेच शाळा प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे आहे याविषयी माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून पालकांना दिली. तसेच पालक संघाने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी, पालक संघाकडून शिक्षकांना भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला. डॉ. राकेश आत्राम, रुपाली धुमाळ यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.यावेळी, मुख्याध्यापक भाऊसो बडधे, मंजुषा चोरामले, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा विद्या टकले, बापू मुळीक, सीमा काळे, पूजा निगडे, शारदा यादव, नरेंद्र महाजन, माणिक शेंडकर, दिपक कांदळकर, पालक प्रतिनिधी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक प्रतिनिधी शीतल चिंबळकर आणि स्मिता कोलते यांनी केले. सुषमा कोलते यांनी आभार मानले.
https://youtube.com/watch?v=RC2gvGRdEG4&feature=शरद
https://themaharashtranews.live/बाल-विकास-मंदिर-शाळेत-शिक/





