सर्व मुख्याध्यापकांनी शिक्षकांना आपल्या वर्गाच्या अध्यापनाबाबत स्वायत्ता दिलेली आहे. त्यामुळे अध्यापनातील गाभा “या हृदयाचे त्या हृदयी’ सांडणे” अतिशय सोपे आणि परिणामकारक झाले आहे.
- २०१९ मध्ये आपल्या शाळेला ‘बालचित्रवाणीवर’ कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली.
- सुरुवातीस कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम-विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करुन शिकवला जाई.
- यानंतर क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम-श्रवण, भाषण, वाचन, लेखन या कौशल्यांवर शिक्षकांनी वेगवेगळे प्रयोग केले.
- श्रवण
- वेगवेगळे आवाज ऐकणे.
- आवाजाचा खेळ.
- गुजगोष्टी.
- माझ्या आईचे पत्र.
- सहज कानी पडणारे आवाज ओळखणे. –
अशा साध्या खेळातून परिणामकारक अध्यापन केले जाते. असेच उपक्रम भाषण, वाचन, लेखन यासाठी राबविले जातात. वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. ग्राममंगलचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या प्रमाणे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण- कृतीयुक्त शिक्षण दिले जाते.
- ज्ञानरचनावादावर आधारित विविध पाठ्यांश,गणिती क्रिया, इंग्लिश या विषयांचा सरावात्मक अभ्यास घेतला जातो.
